अहमदाबाद : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीच्या संघाने ३ गडी गमावत १७व्या षटकात सहज पार केले. धडाकेबाज अर्धशतकासाठी पृथ्वी शॉला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा एकटाच केकेआरवर भारी पडला. या सामन्यात त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत केल्यानंतर पृथ्वीची तथाकथीत प्रेयसी प्राची सिंग खुप खुश झाली. सामना झाल्यानंतर पृथ्वी शॉचे प्रेयसी प्राची सिंगने तोंडभरून कौतुक केले. प्राचीने पृथ्वी शॉचे सामन्यानंतरचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत त्याला कॅप्शन दिले की, ‘मला तुझा अभिमान आहे.’ तर दुसऱ्या फोटोवर तिने कॅप्शन म्हणून लिहिले की, ‘इतके पुरस्कार ठेवण्यासाठी आता नवीन सुटकेसची आवश्यकता भासेल.’ सोशल मीडीयाच्या आधारे प्राची सिंग नेहमी पृथ्वी शॉला समर्थन देत असते.

गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ, प्राची सिंगला डेट करत आहे. प्राची सिंह अभिनय क्षेत्रात नवीनच आहे. प्राची सिंह ही कलर्स टिव्ही शो मध्ये ‘उडान’ या मालिकेत वांशिका शर्माची भूमिका साकारली होती. या सामन्यात पृथ्वी शॉने पहिल्याच षटकात सलग ६ चौकार मारत केकेआरच्या गोलंदाजीची हवा काढुन घेतली. १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने संघाला शतकी सलामी दिली होती. शिखर धवन ४६ धावा करत बाद झाला तर, पृथ्वी शॉने अवघ्या ४१ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. यात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले होते.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : भाजपच्या बनावट अकाउंट वरून शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
- ‘पाकिस्तानची तिजोरी तर रिकामी आहेच, पण आता धान्याचे कोठारही जवळपास रिकामे झाले आहे’
- ‘पाकिस्तानची अवस्था खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’
- 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस,‘या’ जिल्ह्यात रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश
- नांदेड जिल्ह्याात जुगार अड्ड्यावर छापा; १३ जुगारी ताब्यात

