नवी दिल्ली : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात यश आले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव जात आहेत. अनेक राज्यांमधील संसर्गाचे प्रमाण हे चिंता वाढवणारे आहे. मेडिकल ऑक्सिजन, ऑक्सिजन सिलेंडर्स यासाठी संघर्ष करणाऱ्या रुग्णालयांबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. मृतदेह मिळण्यासाठीही लोकांना कित्येक तास वाट पहावी लागत आहे. फक्त सर्वसामान्यच नाही. तर राजकीय नेतेही या परिस्थितीत हतबल झाले आहेत.
यातच मिळलेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशमधील बरेली येथील नवाबगंज मतदारसंघाचे भाजपाचे आमदार केसर सिंह गंगवार यांचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांनी काही दिवसांपूर्वी नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचार कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर घेण्यास सुरुवात केली होती. मात्र रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांनी लिहिलेलं एक पत्र आता व्हायरल होत आहे.
तसेच केसर सिंह गंगवार यांच्या मृत्यू झाल्यानंतर मुलाने आता उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेविरुद्ध प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी म्हंटले आहे की,’ धन्य आहेत योगीजी आणि धन्य आहेत मोदीजी …उत्तर प्रदेश सरकारला त्यांच्या पक्षाच्या आमदारावरही नीट उपचार करता येत नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयाला अनेकदा फोन करुनही कोणी फोन उचलत नाही’ असं केसर यांचा मुलगा विशाल याने सांगितले आहे.
तसेच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जबाबदार धरलं असून गेल्या 10 ते 15 महिन्यांपासून तुम्ही काय करताय?, असा सवाल विचारत केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या भूमिकेवर उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का? या विषयावर कधी तज्ज्ञांशी चर्चा केली होती का?, असा सवालही मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मद्रास उच्च न्यायालयाने एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता मुंबई मनपा म्हणते ‘कॉटन’चा मास्क सुरक्षित नाही!
- सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी एनआयए करणार ?
- ‘हे अॅवार्ड्स ठेवायला नविन सुटकेस हवी’ पृथ्वीच्या खेळीनंतर गर्लफ्रेंड प्राचीने केली स्तुती
- कौतुकास्पद ! जिल्हा परीषद शाळेच्या मुख्याध्यापकाची लसीकरण जनजागृतीसाठी दुचाकीवरून भटकंती
- अडवाणींच्या नावे खोटे ट्विट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार; केशव उपाध्ये यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
