🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी देशात जवळपास साडेतीन लाख कोरोना रुग्ण आढळून आलते. गेल्या सलग चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे आढळून येत आहे. देशात आरोग्यसेवा कमी पडू लागल्या आहे, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे झालेल्या विध्वंसानंतर आता अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमेरिकेतून २८० ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरसह मेडिकल साहित्याची पहिल्या खेप भारतात पोहोचली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अमेरिकेचे आभार मानले आणि सांगितलं की ही गोष्ट महामारीविरोधात लढा देण्यासाठीची आपली सामायिक बांधिलकी दर्शवते.
अमेरिकेच्या हवाई दलाचं सुपर गॅलॅक्सी विमान शुक्रवारी सकाळी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं.या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारं वैद्यकीय साहित्य तसंच १० लाख रॅपिट करोना टेस्ट किट पाठवण्यात आलं आहे. या साहित्यामध्ये १००० ऑक्सिजनचे सिलिंडर, १.५ कोटी एन-95 मास्क आणि दहा लाख रॅपिड डायग्नोस्टिक चाचण्या किट यांचा समावेश आहे.
भारताने अडचणीच्या काळात अमेरिकेला मदत केली होती. आता त्याच भावनेने आम्ही भारताला मदत करू, असे बायडेन यांनी म्हटले आहे.त्याकरताच आता अमेरिकेनेही पुढाकार घेतला असून येत्या आठवड्यात भारताला ७.४१ अब्ज रुपयांच्या आरोग्य साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे व्हाइट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी विभागाद्वारे संयुक्त राष्ट्र भारताला मदत करत आहे. या संकट काळांत उपयोगांत येणाऱ्या विविध आरोग्य उपकरणांसहित ७ हजार ऑक्सिजन काँसंट्रेटर तसंच ऑक्सिजन पुरवढ्यासाठी ५०० नेझल उपकरणं आणि ऑक्सिजन उत्पादक प्रकल्पांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजचे लाभ विनाविलंब द्या,प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे’
- सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी एनआयए करणार ?
- ‘हे अॅवार्ड्स ठेवायला नविन सुटकेस हवी’ पृथ्वीच्या खेळीनंतर गर्लफ्रेंड प्राचीने केली स्तुती
- कौतुकास्पद ! जिल्हा परीषद शाळेच्या मुख्याध्यापकाची लसीकरण जनजागृतीसाठी दुचाकीवरून भटकंती
- अडवाणींच्या नावे खोटे ट्विट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार; केशव उपाध्ये यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
