Share

जालन्यात पावसामुळे पीकांना बसला चांगलाच फटका; शेतकरी हवालदिल

Published On: 

जालना: गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण झाले होते तसेच काही भागांमध्ये पाऊसही पडला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना येथील भोकरदन तालुक्यात काही ठिकाणी गारा सुद्धा पडल्या त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास ८०० हेक्टर वरील पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार संतोष गोरड यांनी रविवारी दिले आहेत.

शुक्रवार व शनीवर सलग दोन दिवस बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती त्यात काढणीला आलेले पीक तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. गहू, कांदा, ज्वारी तसेच काही फळबाग व भाजीपाल्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने रब्बी पिकांची पेरणी केली होती आणि पिके सुद्धा चांगली आली होती मात्र या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेला. तालुक्यात सलग दोन दिवस नैसर्गिक आपत्तीने केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, ग्रामसेवक व कृषीसेवकांना दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती भोकरदनचे तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!