नवी दिल्ली : आज संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. संविधानामुळे भारतातील लोकशाहीला मिळालेली बळकटी ते कोरोना लस या सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केलं.
‘संविधानाच्या तीन भागांच्या भूमिकेपासून ते मर्यादेपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे वर्णन घटनेतच करण्यात आलं आहे. 70 च्या दशकात आम्ही पाहिले की सत्ता विभाजनाची प्रतिष्ठा विस्कळीत करण्याचा प्रयत्न कसा केला गेला. परंतु घटनेतूनचं त्याचे उत्तर देशाला मिळाले.’ अशी आठवण त्यांनी सांगितली.
‘कोरोनाच्या काळात जगाने आपल्या निवडणूक प्रक्रियेची ताकद पाहिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका, निकाल वेळेवर येणे, सहजतेने नवीन सरकार स्थापन होणे इतके सोपे नाही.’ असं वक्तव्य करून त्यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बाबत सूचक विधान केलं आहे. यासोबतच, ‘कालांतराने ज्या कायद्यांचे महत्त्व कमी झाले आहे त्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया देखील सुलभ व्हायला हवी. वर्षानुवर्षे असे शेकडो कायदे काढून टाकण्यात आले आहेत.’ असं देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरुन येणार नाही’ : उद्धव ठाकरे
- पाऊस चांगला झाला, धरणेही भरली आता राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करा : भाजपा
- हैदराबाद पोलिसांकडून भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…
- निर्भया प्रकरणावर आधारित ‘दिल्ली क्राइम’ला आंतरराष्ट्रीय ‘एमी’ पुरस्कार…
- ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

