औरंगाबाद/प्रतिनिधी- बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येऊन पोलीस दलातून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी नॅशनल फेडरेशन वुमन राईट कौन्सिल कौन्सिल म्हणजे मानव अधिकार संघटनेच्या वतीने वतीने अधिकार संघटनेच्या वतीने वतीने मराठवाडाचे जनरल सेक्रेटरी फैय्याज खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे व सहाय्यक फौजदार दिलवाले यांना २६ सप्टेंबर रोजी वाळू ठेकेदाराकडून पावणेपाच लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास औरंगाबाद विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
सहाय्यक निरीक्षक बनसोडे लाचेच्या सापळ्यात अडकल्यामुळे बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला असून, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाईचेही जंगी स्वागत केले आहे. बनसोडे याने तक्रारदाराकडे १८ लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याचे समजते. बनसोडे पोलिस ठाणे अंतर्गत सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा खूप छळ करीत असल्याच्या तक्रारी आहेत.
साधी एनसी देखील लाच घेतल्याशिवाय दाखल करत नव्हता. चाप्टर केस आणि चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेत असल्याच्याही काही तक्रारी आहेत. बनसोडे याचा भाऊ पोलीस अधीक्षक, तर पत्नी देखील सहाय्यक निरीक्षक असून, त्यांच्या बळावर हा खाकी वर्दीतील दरोडेखोर सर्रासपणे लाच घेऊन कामे करत असल्यामुळे पोलीस खात्यासाठी एक कलंक ठरला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
सहायक निरीक्षक बनसोडे याच्या आतापर्यंतच्या कारनाम्यांची माहिती घेऊन मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मानवाधिकार चे जनरल सेक्रेटरी फय्याज खान यांनी केली आहे. लाचेच्या सापळ्यात अटक झाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक बनसोडे याच्या घर झडतीत काय सापडले, याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. बनसोडे याची कुठे – कुठे कोणाच्या नावावर काय काय संपत्ती आहे, याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारकाईने शोध घेऊन नागरिकांसाठी माहिती खुली करणे आवश्यक आहे.
अशा प्रकारचा खाकी वर्दीला कलंक असलेल्या बनसोडे यास पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दुसऱ्या दिवशीच निलंबित केले आहे. मात्र, त्यास बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी आम्ही आपणाकडे या निवेदनाद्वारे करीत आहोत असे मानवाधिकार संघटनेचे जनरल सेक्रेटरी फय्याज खान यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक, पोलीस दलाचे महासंचालक, विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आदींना पाठवण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-
मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही – पीयूष गोयल
-
सुशांतसिंग प्रकरणात भाजपाचे षडयंत्र उघड; एसआयटी चौकशीची काँग्रेस मागणी
-
‘बागायतदार शेतकऱ्यांना ५० हजार प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हजार प्रति हेक्टरी मदत करा’
-
सत्यमेव जयते : पार्थ पवार विरुद्ध रोहित शीतयुद्धाला सुरुवात ?
- औरंगाबाद पोलिसांच्या प्रतिमेला धक्का : पोलीस अधिकाऱ्याने मागितली वाळू ठेकेदाराला लाखो रुपयांची लाच

