Share

औरंगाबाद पोलिसांच्या प्रतिमेला धक्का : पोलीस अधिकाऱ्याने मागितली वाळू ठेकेदाराला लाखो रुपयांची लाच

Published On: 

बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे व सहाय्यक फौजदार दिलवाले यांना २६ सप्टेंबर रोजी वाळू ठेकेदाराकडून पावणेपाच लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली. या सर्व प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास औरंगाबाद विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र आनंदराव बनसोडे( वय 37 वर्ष ) तसेच बाबासाहेब किसनराव दिलवाले वय 54 वर्ष व्यवसाय नोकरी स पो उप नि पोलीस स्टेशन बिडकीन राहणार रांजणगाव रोड बिडकीन यांनी तक्रारदार यांच्याकडून पोलीस स्टेशन बिडकीन ठाण्याच्या हद्दीतील 379 च्या गुन्ह्यांमध्ये जमा असलेले वाळू तसेच चितेगाव येथील मीयाभाई यांची तहसीलदार यांनी जप्त केलेली वाळू लीलावा प्रमाणे पोलीस स्टेशन बिडकीन चा हद्दीतून वाहतूक करण्यासाठी तक्रारदाराकडे ४,७५,०००/- रुपयाची मागणी केली. तक्रारदारांनी औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. यानंतर संबंधित आरोपींच्या विरोधात सापळा सापळा रचून अटक केली.

बनसोडे याने तक्रारदाराकडे १८ लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याचे समजते. बनसोडे पोलिस ठाणे अंतर्गत सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा खूप छळ करीत असल्याच्या तक्रारी आहेत. साधी “एनसी” देखील लाच घेतल्याशिवाय दाखल करत नव्हता. चाप्टर केस आणि चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेत असल्याच्याही काही तक्रारी आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!