Share

मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही – पीयूष गोयल

Published On: 

मुंबई : मुंबई लोकल सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नसल्याचं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्यातील गैरसमज दूर करण्यासाठी पीयूष गोयल यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ” मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा अजून कोणताही प्रस्ताव आला नाही. जोपर्यंत राज्यसरकार प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही.”

दरम्यान, मुंबई लोकल 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू करू, असं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांनी एका वृत्रपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आणि लोकसंख्येचा विचार करता कार्यालयाच्या वेळेत बदल करण्याचा विचार सुरू आहे. कार्यालयातील कामासाठी पूर्ण 24 तासाचा वापर करता येतो का, यावर विचार सुरू आहे. यातून लोकल सेवेवर अतिरिक्त ताण येणार नाही. तसे झाले तर ऑक्टोबरपासून सर्वांसाठी लोक सुरू होऊ शकते. याबाबत उद्योजकांशीही संवाद सुरू असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!