Share

खुशखबर : मोदी ‘या’ दिवशी करणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत  दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील  हप्त्याचे वितरण करणार आहेत. या योजनेद्वारे 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वितरण होणार असून त्याचा  लाभ 9 कोटी 75 लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधितही करणार आहेत. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2000/- रुपये  तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण 6000/-रूपये इतका निधी दिला जातो.

हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे  शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 1.38 लाख कोटी इतका सन्मान निधी हस्तांतरित करण्यात आली आहे. केंद्रीय कृषीमंत्रीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!