🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने तेजस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना खास शुभेच्छा दिल्या आहे. नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स असं म्हटलं आहे. त्याचबरोबर आता ‘एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे’ असे खास ट्वीट नार्वेकर यांनी केले आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्या या ट्वीटचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या या ट्वीट मधून ते नेमके कोणाला लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत? तसेच तेजस ठाकरे आता अधिकृतपणे राजकारणात प्रवेश करणार का ? असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागेले आहेत.
दरम्यान, तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) August 7, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- बुरखा परिधान न केलेल्या महिलेला तालिबानी दहशतवाद्यांनी कारमधून ओढून गोळ्या घातल्या
- 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी
- तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

