नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा कम्युनिस्ट पक्षाचे युवा नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा पक्षप्रवेश झाला.
यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमारने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पंतप्रधान फक्त नावाला आहेत, देशाला फक्त काँग्रेसच वाचवू शकते, असं मत कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि, ‘आज जेव्हा आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षप्रवेशाचा अर्ज भरत होतो, तेव्हा जिग्नेश यांनी त्यांना संविधानाची प्रत भेट दिली आणि मी त्यांना भगतसिंग, गांधी आणि आंबेडकरांची प्रतिमा दिली. कारण आज या देशाला आंबेडकरांच्या समानतेची, भगतसिंगांच्या शूरतेची आणि गांधीच्या एकतेची गरज आहे.’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच ‘कॉंग्रेस हा पक्ष आहे जो महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, आंबेडकर, नेहरु, भगतसिंग यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. समानता आणि समता ही कोणा एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तो भारताचा इतिहास आहे. आणि भारताच्या या इतिहासाला काँग्रेस या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाने आपल्यात सामावून घेतलं आहे.
त्यामुळे मला असं लक्षात येत आहे की देशात भाजपासमोर इतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे काँग्रेस या सर्वात जुन्हा पक्षाला वाचवलं नाही, मोठ्या जहाजाला वाचवलं नाही, तर इतर छोटी जहाजंही बुडून जातील.’ असे मत यावेळी कन्हैया कुमारने मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ढगफुटी सदृश्य पावसाने औरंगाबादला झोडपले मात्र; चर्चा रंगली ती ‘स्मार्ट’ औरंगाबादच्या महानगरपालिकेची!
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
