Share

सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग; गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर वळसे-पाटलांच भाष्य

Published On: 

मुंबई : काल अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नैतिकतेचे भान राखून राजीनामा दिल्याचे राष्ट्रवादी कडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रिक्त झालेल्या महत्वाच्या गृहमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार यावर उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे अत्यंत महत्वाच्या व संवेदनशील असलेल्या गृहमंत्रीपदाचा कारभार सोपवला आहे. दिलीप वळसे-पाटील यांचा दांडगा अनुभव व नेतृत्व बघता ते अडचणीच्या काळात महाविकास आघाडीमधील समन्वय साधून कारभार करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले.

‘सध्याच्या काळात माझ्यावर विश्वासानं सोपवलेली जबाबदारी पेलणं हे मोठं आणि आव्हानात्मक काम आहे. परंतु, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांच असलं तरी कोरोनामुळे त्यांना फिल्डवर काम करावे लागत आहे. या महिन्यात सर्व धर्मीय सण-उत्सव देखील येत आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे,’ असं भाष्य दिलीप वळसे-पाटील यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!