जालना: मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे तसेच काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पसरले आहे. उन्हाच्या त्रासापासून जराशी सुटका जरी मिळत असली तरी या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बीड जिल्ह्यासोबतच जालना जिल्ह्यात सुद्धा पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरात अर्धा तास पाऊस तसेच काही वेळ गारपीट झाली. जालना, भोकरदन, जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात वारे अन् हलका पाऊस झाला. राज्यात आठवड्याभरात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याची सुरुवात मागील आठवड्यात झाली. रविवारी जिल्हाभरात वादळी वाऱ्याला सुरुवात होऊन विजा कडाडल्या. परिणामी नुकतीच लागवड होत असलेल्या मिरची पिकाला याचा काही प्रमाणात फटका बसला.
सोमवारपासून ४ ते ६ पर्यंत ढगाळ वातावरण तसेच गरमी वाढेल, तर ७ ते ११ मे यादरम्यान भाग बदलत पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. ७ ते ९ या दोन दिवस केवळ ढगाळ वातावरण जिल्ह्यात होते. रविवारी दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत सायंकाळी विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये गारपीटही झाली. भोकरदन, जाफराबाद, जालना तालुक्यासह बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वारा तसेच हलका पाऊस झाला.
महत्वाच्या बातम्या
- रुग्णसेवेत कसलीही तडजोड नको; आरोग्य सेवा दर्जेदार असावी, राजेश टोपेंचे वक्तव्य
- काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केली कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज मिळणार
- ‘बंगालसारखा खेळ महाराष्ट्रात खेळू नका’, अशोक चव्हाण यांनी भाजपला खडसावले
- श्रीलंका दौर्यासाठी अशी असेल टीम इंडिया ; ‘या’ अनुभवी खेळाडूला मिळू शकेल कर्णधारपद
- बीडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
