बीड: एकीकडे कोरोनाचे थैमान सुरु आहे तर दुसरीकडे मात्र गुन्हेगारी देखील कोरोनासारखी वाढत आहे. अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे सर्रासपणे सुरु असून मोठ्या प्रमाणात जुगारी एकत्र जमून जुगार खेळत असल्याचे आढळून येत आहे. आहेर वडगाव शिवारात असाच एक जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रविवारी पोलिसांनी छापा मारून त्यांच्यावर कारवाई केली.
आहेर वडगाव शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी दुपारी बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यात १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व १७ दुचाकी असा एकूण १४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांनी ही कारवाई केली.
जिल्ह्यात एकीकडे कडक लॉकडाऊन असताना दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र अवैध धंदे जोरात सुरु आहेत. जुगार अड्डेही सुरु आहेत. आहेर वडगाव शिवारात चौरे यांच्या शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांना मिळाली होती. त्यांनी कर्मचाऱ्यांसह जाऊन रविवारी दुपारी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये जुगार खेळताना बारा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ६० हजार ६०० रुपयांची रोकड, २ लाख ८ हजारांचे जुगार साहित्य व मोबाईल ,१२ लाख ५ हजार रुपयांच्या १७ दुचाकी असा एकूण १४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस हवालदार रमेश दुबाले यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
- लॉकडाऊनमध्ये दुकानदारी पडली महागात; बीडच्या मोंढा परिसरात १० दुकाने सील
- राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे?
- राज्य सरकारने तात्काळ मागासवर्गीय समाजाला पदोन्नतीतील आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढावा – खरात
- इंग्लंड दौऱ्यात उडानकटला वगळल्याने ‘या’ माजी क्रिकेटपटुने व्यक्त केली नाराजी; उडानकटने दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

