औरंगाबाद : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर स्थानिक अधिकार्यांमधून निवडीने नियुक्तीसाठी मुख्य लेखापरिक्षक पात्र असणार नाही. मात्र पालिकासेवेत उपायुक्त व वैधानिक समकक्ष पदावर दहा वर्ष सेवा पूर्ण होणार्या विभागप्रमुखांची नियुक्ती करता येईल, असे राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
या आदेशात म्हटले आहे की, पालिकेतील अतिरिक्त आयुक्ताच्या पदावर अधिकार्यांमधून निवडीने नियुक्ती करताना पालिकेच्या तांत्रिक व लेखा सेवेतील समकक्ष अधिकार्यांचाही विचार करण्यात यावा अशी तरतूद आहे. तथापि, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ४७ (२) मधील तरतूद विचारात घेता पालिका अधिकार्यांमधून अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्तीसाठी मुख्य लेखापरिक्षक पात्र नसतील.
तसेच अतिरिक्त आयुक्ताच्या पदावर पालिकेतील अधिकार्यांमधून निवडीने नियुक्ती करताना पालिकेच्या सेवेत उपायुक्त किंवा वैधानिक समकक्ष पदावर सदर पदांना अधिनियमातील कलम ४५ नुसार शासनाची मान्यता प्राप्त झाल्यापासून किमान दहा वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे. पालिकेने निर्माण केलेल्या पदावरील सुयोग्य अधिकारी हे विभागप्रमुख असणे अभिप्रेत असल्याचे नगरविकास विभागाने या आदेशात नमुद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटीच्या परभणी विभागास मालवाहतुकीचा आधार; दीड महिन्यात १२ लाखांचे उत्पन्न
- ‘नागपूरात कोरोनाने थैमान घातले असताना फडणवीस, गडकरी कुठे आहेत ?’
- वैद्यकीय सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी घाटीतील वैद्यकीय अधिकारी संपावर!
- स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी आणली कोरोना हेल्थ पॉलिसी
- कर्जाची हप्ते वसुली थांबवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदींकडे महत्वाची मागणी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

