🕒 1 min read
परभणी : कोरोनाच्या काळ तसेच लॉकडाऊन आणि संचारबंदीमध्ये देखील एसटी विभागास मालवाहतुकीने मोठा आर्थिक मिळकत मिळवली आहे. दरम्यान वेळी दीड महिन्यामध्ये १२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या विळख्यामुळे जिल्ह्यातील महामंडळाच्या एसटीची चाके जागेवरच बसली आहेत. परजिल्ह्यातील प्रवाश्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध घातला असतानाच जिल्हाअंतर्गत सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने मोठ्या आर्थिक तोटा झाला आहे.
दरम्यान, दीड महिन्यात २०७ फेऱ्यातून २३ हजार ५७० किलोमीटर प्रवास करत १२ लाख २० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे.कोरोनाचा कहर थांबत नाही. मागील वर्षी लॉकडाऊनच्या पाच महिन्याच्या काळात प्रवाशी वाहतूक ठप्प होती. त्या काळातही एसटीला मालवाहतूकीने मोठा आर्थिक धीर दिला होता. तेच चित्र आहे. एसटीने मालवाहतुकीवर पूर्णतः लक्ष केंद्रीत केले. जिल्हाअंतर्गत सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मालवाहतुकीच्या माध्यमातून नेमकी हीच वेळ कॅश करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने पुन्हा घेतला होता. त्याचा फायदा देखील एसटी महामंडळाच्या प्रशासनाला झाला आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशी सेवेस प्रतिबंध होते. तर मालवाहतुकीच्या माध्यमातून आर्थिक स्त्रोत निर्माण केला. हा स्त्रोत पुढे आल्याबरोबर एसटीच्या मालवाहू बसेस आगाराबाहेर पडल्या. कोरानाच्या काळामध्ये एसटी अधिकारी – कर्मचाऱ्यांनी एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. परभणी विभागातील सातही आगारातून मालवाहतुकीसाठी ट्रक पाठवले होते. सर्वच ठिकाणी त्यांना माल वाहतुकीसाठी खुप चांगला प्रतिसाद मिळाला. एसटीने धान्य, सरकी, पशु खाद्य, पेंड, खते, बियाणे आदींची वाहतूककरुन आर्थिक मिळकत मिळवली.
असे मिळवले उत्पन्न
मार्च महिन्यात ट्रकच्या 146 फेऱ्याव्दारे 16 हजार 396 किलामीटरचा प्रवास केला. यामधून ८ लाख 82 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. तर एप्रिलच्या 14 दिवसात म्हणजे १ ते 14 एप्रिल या काळात 61 फेऱ्यांव्दारे ७ हजार 174 किलोमीटर प्रवास करत ३ लाख 38 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.१ मार्च ते 14 एप्रिल या दीड महिन्यात 12 लाख 20 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवले असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

