Share

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी आणली कोरोना हेल्थ पॉलिसी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जगभर कोरोनाने थैमान घातलेले असताना देशात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामध्ये आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्यानं अनेक वैद्यकीय सेवांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आरोग्य विम्याचा आधार असतो. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी कोरोना हेल्थ पॉलिसी आणली आहे.

एसबीआयने सुरु केलेल्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला कमी प्रीमियममध्ये कोरोना आजारावर उपचार करण्यात बँक आपल्याला मदत करेल. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रीमियमच्या आधारे सुविधा देण्यात येतील. या पॉलिसीमध्ये, आपल्याला उपचाराचे प्रमाण आणि कालावधीनुसार प्रीमियम भरावा लागेल. या पॉलिसीचे नाव ‘कोरोना रक्षक’ असे आहे.

ही पॉलिसी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक घेऊ शकतात. यासाठी आपल्याला प्रथम कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही. आपण ही पॉलिसी ऑनलाइनद्वारे खरेदी करू शकता, ज्यामध्ये आपल्याला कव्हर पैसे आणि वेळ निवडावा लागेल. आपले प्रीमियम फक्त त्या आधारावर निर्धारित केले जाते.

कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये किमान प्रीमियम 156 रुपयांपर्यंत आणि कमाल 2230 रुपयांपर्यंत असू शकतो. स्टेट बँकेच्या कोरोना रक्षक पॉलिसीचा कालावधी 105 दिवस, 195 दिवस आणि 285 दिवस असतो आणि त्यानुसार प्रीमियम बदलला जाऊ शकतो. तसेच या पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही 50 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत कव्हर घेऊ शकता. कोरोना पॉलिसीबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहक 022-27599908 वर एक मिस कॉल देऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या         

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!