Share

शिर्डीतील ड्रेसकोडचा वाद चिघळण्याची शक्यता; तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- साई मंदिरात प्रवेश करताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन साई संस्थानने केलेले आहे. साई मंदिर परिसरात तशा आशयाचे फलकही लावण्यात आलेले आहेत. साई संस्थानच्या याच आवाहनावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. तृप्ती देसाई या सकाळीच पुण्याहून शिर्डीकडे जाण्यासाठी रवाना झाल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखलं आणि ताब्यात घेतलं. यावेळी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली.

देसाई यांनी शिर्डीला जाणार असल्याचे जाहीर केल्यामुळे साई मंदिरात लावलेल्या त्या बोर्डामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यानंतर शिर्डीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देसाई यांना 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. असं असलं तरीही आज शिर्डीमध्ये जाऊन ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणार असल्याचा दावा देसाई यांच्याकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिर्डीमध्ये जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुपे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं, असं आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आलं आहे. मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं,” असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!