Share

मास्क परिधान केलं नाही म्हणून ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी तब्बल 10 हजारांचा दंड ठोठावला

Published On: 

देवरिया- देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतान देखील अनेक महाभाग कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिस्थिती बिकट बनत चालली असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांनी नियमांचं पालन करावं यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात मास्क न घालणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

उत्तर प्रदेशच्या देवरियामध्येही पोलिसांनी केलेली कारवाई सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. याठिकाणी पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीला मास्क परिधान केलं नाही म्हणून चक्क 10 हजारांचा दंड ठोठावला गेल्याने या कारवाई बाबत चांगलीच चर्चा होत आहे.

देवरियाचे पोलिस अधीक्षक श्रीपती मित्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हाच व्यक्ती पोलिसांच्या तपासणीमध्ये मास्क परिधान न करता फिरताना आढळला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाईही केली. त्याला 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण त्यातून त्यानं काहीही धडा घेतला नाही. दोन दिवसांनंतर पुन्हा पोलिसांना तो विनामास्क फिरताना आढळला तर पोलिसांनी त्याला 10 हजारांचा दंड ठोठावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!