Share

पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त, घातपाताचा मोठा कट उधळला

Published On: 

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात सलग तीन चकमकी उडाल्या असून पोलिसांनी नक्षलवाद्यांना पळवून लावत नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प त्यांनी उधळून लावला असा दावा केला आहे.

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे मोठे शिबिर असल्याच्या माहिती पोलिसांनी मिळाली. यावरून नक्षलविरोधी अभियान पथक सी-६० चे जवान अभियान राबवण्यास गेले होते. यावेळी भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी अचानक अभियान पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. जवानांनी पाठलाग केला तेव्हा त्यांनी पुन्हा गोळीबार केला व पळून गेले असाच प्रकार तिसऱ्यांदा घडला. ही चकमक जवळजवळ अर्धा ते पाऊण तास चालली.

सी-६० जवानांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध मोहीम राबवली असता परिसरात नक्षलवाद्यांचे मोठे शिबिर असल्याचे आढळून आले. या शिबिरातून आयईडी, नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. आयईडी जागेवरच नष्ट करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या असून त्यावर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे. पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाचा एक भाग म्हणून त्यांनी या भागातील गस्त आणि कारवाया वाढवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!