मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता दुपारी १२.३० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने देखील दमदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागी आघाडीवर आहे. यात भाजपा ७० जागा, जदयू ४८, व्हीआयपी ६, तर हम एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान,कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील आताचे कल कायम राहिलेत एनडीए पुढं जाताना दिसत आहे. मात्र, त्याबद्दल आताच काही बोलता येणार नाही. नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसला 27 च्या आसपास जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. ते होताना दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला लगावतानाच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे या भाजपच्या प्रयोगामुळेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मोठा फटका बसल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.बिहार निवडणुकीचे कल पाहिले तर भाजपची पहिल्यासारखी लाट राहिलेली दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाटही राहिली नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फ्रान्सच्या राष्ट्रपतीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत अहमदनगरमध्ये आंदोलन!
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- बिहारच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस; पूर्ण निकाल येण्याआधीच भाजप नेत्याने दिलं श्रेय
- बिहारची निवडणुक लढविणाऱ्या सेनेच्या वाघांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता
- सांगलीत चोरांनी चोरीसाठी वापरलेली आयडिया पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

