Share

अर्णबला तगडा झटका; रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ !

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. काल अर्णबच्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने दिलासा न देता न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या अलिबाग सत्र न्यायालयात जामीनासाठी पुन्हा याचिका दाखल करण्यास सांगितले.

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी बनावट टीआरपी रॅकेट उघडकीस आणल्यानंतर यात रिपब्लिक भारत, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचे नाव समोर आलं होतं.या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सहउपाध्यक्ष घनश्यामसिंह यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने घनश्यामसिंह यांनी त्यांच्या घरातून आज सकाळी अटक केली. बनावट टीआरपी प्रकरणी आतापर्यंत एकूण 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याआधी काही वेळा घनश्यामसिंह यांची चौकशी करण्यात आली होती. सिंह यांच्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या गोस्वामींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातही गोस्वामी यांच्यावर कारवाई होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!