मुंबई : आगामी नवरात्रोत्सवादरम्यान महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वीच अटक केली होती.
तर महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकत्रितपणे दहशतवादी मॉड्यूल संबंधित काल, शनिवारी जोगेश्वरी येथून संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईत हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या एका आरोपीला मुंब्रामधून एटीएसने अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव इमरान उर्फ मुन्ना भाई असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Anti-Terrorism Squad has arrested a suspect from the Mumbra area, to be presented before ATS court today
— ANI (@ANI) September 19, 2021
काल मुंबई एटीएसने झाकीर हुसैन शेख यांना अटक केली होती. झाकीरच्या चौकशीत आणखी एकाचं नाव पुढे आलं. ज्यानंतर मुंब्रा परिसरात ATS ने छापेमारी केली. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रेनमध्ये गॅस हल्ला करण्याचं प्लॅनिंग रचत होते. या अलर्टनंतर जीआरपीने मुंबईच्या सर्व मोठ्या रेल्वे स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. तर स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त इतर सर्व गेट्स बंद करण्यात आले. त्यात एटीएसनं इमरान उर्फ मुन्नाभाईला अटक करुन कोर्टात हजर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानी खेळाडूच्या ‘त्या’ ट्विटवर किवी क्रिकेटपटूचे चोख प्रत्युत्तर
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत

