Share

एकाच दिवसात गोल्डनबॉय नीरज चोप्राला दोन पुरस्कार; भावनिक होत म्हणाला…

Published On: 

नवी दिल्ली : टोकयो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी ट्रॅक अँड फील्डमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्रा याने इतिहास रचला होता. त्याचे संपूर्ण देशवासीयांनी कौतुक केले होते. आता गोल्डनबॉय नीरज चोप्राला एकाच दिवशी परम विशिष्ट सेवा मेडल आणि पद्मश्री हे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.

नीरजने दोन्ही पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ बनवून सगळ्यांचे आभार मानले आहे. ज्यात आनंद व्यक्त करताना तो म्हणाला ” पद्मश्री पुरस्कार आणि परम विशिष्ट सेवा मेडलने मला सन्मानित केल्या गेल्याची बातमी ऐकून मी आनंदित आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंबा आणि आशीर्वादसाठी धन्यवाद. मी नेहमीच देशासाठी मेहनत आणि सर्वश्रेष्ठ परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत राहील.”

नीरजला गेल्यावर्षीच अर्जुन पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित केले गेले होते. नीरज सध्या पुढील स्पर्धेसाठी अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहे. यावर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तो पुन्हा सुवर्णपदक पटकावण्यासाठी मेहनत घेत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!