Share

“मोठ्या माणसांशी मोठ्या माणसांनीच बोलावं, मी फार छोटा माणूस…”, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Published On: 

पुणे : पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि शाळा सुरु करण्याबाबत झालेल्या आढावा बैठकीवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार विश्वासात घेत नाहीत, आम्ही केलेल्या सुचनांना ते केराची टोपली दाखवतात, त्यामुळे मी त्यांच्या बैठकीत हजेरी लावत नाही, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. त्यावर आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील इतकी मोठी व्यक्ती आहे की त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल एका छोट्या अजित पवाराने टीका करणं काही बरोबर नाही. मोठ्या माणसांबद्दल मोठ्या माणसांनी बोलावं, मी अतिशय छोटा आहे.’

पुढे अजित पवार म्हणाले, ‘गेल्या काळात वन नेशन वन टॅक्स असा निर्णय झाला आणि जीएसटी आलं. त्याला आता पाच वर्ष झाली आहेत. त्या पाच वर्षाच्या काळात केंद्र ठराविक रक्कम राज्यांना देत होतं. ती आता बंद होणार आहे. सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांनी करोनाची दोन वर्ष कठीण गेली असून अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्या पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्ष वाढवावी, अशी मागणी केली आहे. आता त्यावर काय निर्णय घेतात ते पहावं लागेल,’ असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!