मुंबई : तब्बल अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजाकसत्ताक दिनी आयोजीत कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर ७३ व्या प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाण्यापूर्वी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या
१२ नोव्हेंबरला मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर २ डिसेंबरला उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. तेव्हापासून उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसूनच राज्याचा कारभार पाहत आहेत. या काळात सर्व प्रशासकीय चर्चा, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांना उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच हजेरी लावत होते. गेल्याच महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते. इतका काळ मुख्यमंत्री दिसत नसल्याने विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली होती. मुख्यमंत्रीपदाचा चार्ज तात्पुरता दुसऱ्या नेत्याकडे द्यावा, अशी मागणीही भाजपच्या नेत्यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर फौजी पित्याने कोर्टाबाहेर घातल्या गोळ्या; वाचा संपूर्ण घटनाक्रम
- सिरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार; शरद पवार म्हणाले, “माझा बॅचमेट…”
- “अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली”; सोमय्यांना नोटीस पाठवल्यामुळे फडणवीस संतापले
- “माफियाराजवर बोलत असाल तर…”; धनंजय मुंडेंचे पंकजांना आव्हान
- कॅप्टन विराट होता, पण सगळे धोनीचं ऐकायचे दिनेश कार्तिकनं केला गौप्यस्फोट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
