Share

विभागीय आयुक्तांकडून झालेल्या सत्काराने ऑक्सिजन टँकरचालक भारावले

Published On: 

औरंगाबाद : ऑक्सिजन टँकर चालकांच्या अथक परिश्रमाने तसेच अविरत वाहन चालवून नियोजित ठिकाणी आणि नियोजित वेळेत ऑक्सिजन टँकर पोहचवून एक प्रकारे ऑक्सिजन टँकर चालक हे कोरोनारुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. त्यांच्यामुळेच रुग्णांचे प्राण वाचले असल्याचे गौरवोद्गार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काढले. कोरोना संकट काळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ऑक्सिजन टँकर चालकांचा अनौपचारिक सत्कार विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानी पार पडला.

मराठवाडा विभागात कोरोना सारख्या संकट काळात देखिल ऑक्सिजनची कमतरता येऊ न देता उत्तम प्रकारे कोरोनाकाळ हाताळला गेला असे सांगून केंद्रेकर म्हणाले की, सर्व सोईसुविधांसह जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयातून उत्तम प्रकारे कोरोनाकाळात जबाबदारीने कर्तव्य पार पाडले आहे. त्यात ऑक्सिजन टँकरचालकांचा मोठा वाटा असून या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणजे मराठवाड्याची उपचाराबाबत चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे.

मराठवाडा विभागात ऑक्सिजनचा वापर, बेड उलब्धता, रेमडिसिवीरची उपलब्धता आदी आरोग्य साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. याबरोबर योग्य नियोजनामुळे कोरोना संसर्गाच्या संक्रमणाच्या प्रतिबंधाकरीता प्रशासनाला यश आले आहे, असे सांगून केंद्रेकर यांनी यावेळी टँकर चालकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच कर्तव्यावर असताना टँकरचालकांना आलेले अनुभव देखिल जाणून घेऊन त्यांच्याशी मुक्तसंवाद साधला.

सत्काराला उत्तर देतांना ऑक्सिजन टँकरचालक राजू जोगदंड म्हणाले की, ‘प्रशासनाने आमची दखल घेतल्याने आम्ही भारावलो आहोत. या काळात आम्ही जीव लावून अविरत काम केले परंतु या कामाचे मोल झाल्याचे आम्हाला समाधान आहे.’

यावेळी केंद्रेकर यांच्या हस्ते अपर विभागीय आयुक्त अविनाश पाठक, उपायुक्त विना सुपेकर, यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर राजू जोगदंड, दिनेश चिंचने, राम खटले, माधव गवई, दीपक गोर्डे, ऋषी वाणी, विष्णू बहीर, ज्ञानेश्वर निकाळजे, दीपक आलदाट, सय्यद निसार या ऑक्सिजन टँकरचालकांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!