Share

सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची भाजपची मागणी

Published On: 

मुंबई –  18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारने त्यांच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

केंद्र सरकारने 18 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. यातील 50% लस ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची व्यवस्था करावी असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.

देशातील अनेक मध्यप्रदेश, बिहार या राज्यांनी मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित लोकांची संख्या जास्त असल्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाला आहे. सद्यस्थितीतील टाळेबंदी लावण्याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दोन दोन आठवडे टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांना सरकारने आता तरी मदत करावी असेही आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.

पहिल्या टाळेबंदी नंतर महाराष्ट्र सरकारने कुठलंही पॅकेज अथवा मदत ही सर्वसामान्य माणसाला केली नव्हती त्यामुळे अकार्यक्षम सरकार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना विरुद्धच्या लसीकरण कार्यक्रमात आपली अकार्यक्षमता न दाखवता सर्व बाबी लक्षात घेऊन 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारने आपल्या कोट्यातून मोफत लस द्यावी अशी आग्रही मागणी आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!