🕒 1 min read
नागपूर : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. देशात मोठा व जुना पक्ष म्हणून नावलौकिक असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात देखील मोठं यश पत्करावं लागलं होतं.
२०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये तर महाराष्ट्रातून काँग्रेसला फक्त एका जागेवर यश मिळवता आलं. काँग्रेसच्या त्याच एकमेव खासदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ललकारलं आहे. खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी तयारी दर्शवली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत तयारीसाठी फक्त 15 दिवस मिळाले होते. आता तयारीला तीन वर्षे बाकी आहेत. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे, असं खासदार बाळू धानोरकर म्हणाले आहेत. त्यामुळे पक्ष आता त्यांच्या या मागणीचा कितपत विचार करणार हे देखील येत्या काळातच समजेल. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलासाठी हालचाली वाढल्या असून बाळू धानोरकर यांनी मंत्री अशोक चव्हाण व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट देखील घेतली होती. या भेटीमागील कारणांवरून अनेक तर्क-वितर्क लावले गेले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत आहे’
- ‘धनंजय मुंडेंनी आपले विवाहबाह्य संबंध लपविले नाहीत ही बाब मर्दपणाची’
- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे?
- ‘महाजेनको’ निर्मिती संचालकपदाच्या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करा- भाजपा
- औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्गाचा लवकरच सर्व्हे-खा.कराड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

