🕒 1 min read
पुणे:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एका महिलेने केलेल्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे मुंडे यांच्यासोबतच पक्षाच्या नेत्यांना देखील टीकेचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे तक्रारदार महिलेकडून मला आणि माझ्या वकिलांना जीवे मारण्याचीही धमकी मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंडे यांचे प्रकरण बाहेर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून केली जात आहे. परंतु चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय घेऊ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपावरून राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेले असताना त्यांना मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. खेडेकर यांनी सविस्तर पोस्ट लिहून मुंडे हे कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, मुंडे यांच्या वैवाहिक जीवनात कुरबुरी सुरू झाल्या आहेत, अशा स्वरुपाची चर्चा ऐकायला मिळाली. याच वेळी मुंडे यांनी स्वतः फेसबुकवर या आरोपांना सविस्तर उत्तर दिले. त्यांचे स्पष्टीकरण, त्यातील स्पष्टता, सहजता व जबाबदारी समजून वागणूक हे सर्व ऐकून मला मुंडे यांच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे. त्यांनी दिलेल्या जाहीर स्पष्टीकरणाबद्दल मी मुंडे यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी सामाजिक कार्यकर्ते या नात्याने खंबीरपणे उभे राहणार असल्याचे जाहीर करतो.
धनंजय मुंडे यांनी अशा विवाहबाह्य संबंधांना लपवून ठेवले नाही हे लक्षात घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाबाबत कुटुंब व विशेषतः बायकोपासून हे संबंध लपवून ठेवलेले नव्हते व नाहीत. ही बाब उमदेपणाची किंवा अलंकारिक अर्थाने घ्यावयाचे म्हटल्यास मर्दपणाची आहे. विवाहबाह्य नात्यांना नैतिक उंची व समाजमान्यता देणारी आहे, अशा बेधडक शब्दांत खेडेकरांनी मुंडेंना पाठिंबा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत आहे’
- मातंग समाजाच्या आरक्षणासाठी दलित महासंघाच्या वतीने होणार राज्यभर आंदोलन
- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे?
- ‘महाजेनको’ निर्मिती संचालकपदाच्या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करा- भाजपा
- औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्गाचा लवकरच सर्व्हे-खा.कराड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

