Share

‘धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत आहे’

Published On: 

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एका महिलेने केलेल्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे या मुले मुंडे यांच्यासोबतच पक्षाच्या नेत्यांना देखील टीकेचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे तक्रारदार महिलेकडून मला आणि माझ्या वकिलांना जीवे मारण्याचीही धमकी मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंडे यांचे प्रकरण बाहेर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून केली जात आहे. परंतु चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय घेऊ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली.

राज्याचे गहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांनी संपूर्ण प्रकाराची एका आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र भाजपने हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या मुद्यावरून चांगलीच टीकेची झोड उठवली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही…असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!