औरंगाबाद : लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर तसेच केंद्रावर टीकास्त्रांचा प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. या हिंसाचार प्रकरणी शेतकऱ्यांना भेटायला जात असणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार रजनी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
देशातील तरुण, छोट्या व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. अमेरिकी कंपनी ॲमेझॉनने देशाला आठ हजार ५४६ कोटी रुपये दिल्याचे कंपनीच्या रेकॉर्डवर आले आहे. देशातील व्यापारविषयक कायदे बदलण्यासाठी ही रक्कम लाच म्हणून दिली गेली, असा आरोप रजनी पाटील यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशी घोषणा केली; पण ॲमेझॉन कंपनीने दिलेले आठ हजार ५४६ कोटी रुपये गेले कुठे? मोदी सरकारने लाच खाल्ली आणि खाऊही दिली, असा आरोप रजनी पाटील यांनी केला आहे. ही रक्कम सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी व भाजप पदाधिकाऱ्यांना दिली गेली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा, अशी मागणी दोघांनी काल पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करत रजनी पाटील यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर टीका केली. योगी आणि तालिबान्यांमध्ये काहीच फरक नाही. फरक असेल केवळ दाढीचा! ‘बेटी बचाव’चे नारे देणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या मुलीला अशी हीन वागणूक ते कसे देऊ शकतात? याचा आम्ही धिक्कार करतो, असंही रजनी पाटील म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपला धक्का; मुंडण करत या भाजप आमदाराची पक्षाला सोडचिट्ठी
- ‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’
- …म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला
- काँग्रेसला धक्का ! राहुल गांधींच्या जवळील आणखी एका नेत्याचा राजीनामा‘
- महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करणार’, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची ग्वाही!


