नवी दिल्ली : केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी केरळ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पीव्ही बालचंद्रन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून लोकसभेत निवडून गेले आहेत.
बालचंद्रन यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. बालचंद्रन यांनी बहुमत आणि अल्पसंख्यांक हे दोन्ही समुदाय काँग्रेसपासून दूर जात असल्याचा आरोप केला आहे. मी मागील ५२ काँग्रेससोबत होतो मात्र आता या पक्षाने दिशा गमावली आहे. तसेच पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावरही त्यांनी टिका केली आहे. लोकांना प्रभावित करणाऱ्या मुद्यांवर ते स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यास सक्षम नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच काँग्रेसला कार्यकर्त्यांच्या भावनांनुसार काम करता येणार नाही असे वाटत असल्याने राजीनामा देत आहे असे बालचंद्रन म्हणाले. यापूर्वी विरोधीपक्षनेते व्हीडी सतीसन यांच्यावर नाराज होऊन केपी अनिल कुमार आणि पीएस प्रशांत या प्रमुख नेत्यांनीही राजीनामा दिला होता. यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीत याचे परिणाम दिसून येणार आहेत.
दरम्यान भाजपनेही येथील पक्ष नेतृत्वात मोठे बदल केले आहे. प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या यादीनुसार वरिष्ठ नेते एएन राधाकृष्णन आणि शोभा सुरेंद्रन उपाध्यक्षपदी कायम राहतील, तर अन्य ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे प्रवक्ते के. गोपालकृष्णन यांनाही त्याच पदावर बढती देण्यात आली आहे. ई कृष्णदास पक्षाचे नवीन कोषाध्यक्ष असतील असे राज्य भाजपाने म्हटले आहे.