🕒 1 min read
औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील ज्या गावात १० पेक्षा जास्त बचत गट असेल त्या गावात बचत गटांसाठी व्यापार संकुल व ग्रामसंघ बैठकीसाठी सुविधा निर्माण करू असे स्पष्ट करीत महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत समूह संसाधन व्यक्ती तसेच महिला बचत गटाच्या कामकाजाबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथे सोमवार ( दि. ४) रोजी आढावा बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करीत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. याबैठकीत बचत गटांचे काम करणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या.
महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी गावातील शाळेत दीड दिवसांचा बाजार सुरू करणे, अजिंठा, फर्दापूर येथे सरस लक्ष्मीच्या धर्तीवर मेळावा आयोजित करण्याबाबत तसेच समूह संसाधन व्यक्ती यांना वेळेवर मानधन मिळावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महिला बचत गटांचे काम उल्लेखनीय असून बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती, गटप्रवर्तक यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात लवकरच मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या प्रश्नांची सोडवणूक करू असे स्पष्ट करीत महिलांच्या सक्षमिकरणासाठी बचत गटांना सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- अभिनेता परेश रावल ‘omg 2’ चित्रपटात दिसणार नाही.., कोण साकारणार ‘ही’ भूमिका?
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट
- ‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’
- सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
