Share

भाजपला धक्का; मुंडण करत या भाजप आमदाराची पक्षाला सोडचिट्ठी

Published On: 

कोलकता : मागील काही महिन्यांपासून भाजपमधून बाहेर पडणाऱ्या आमदारांची रांग लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत पाच आमदारांनी पक्ष सोडला आहे. इतर राज्यांतून काही आमदार पक्षातून बाहेर पडले आहे. मंगळवारी त्रिपुरातील एका आमदारानं मुंडण करत पक्षाला रामराम ठोकला. लवकरच ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अनेक वर्ष भाजपसोबत असलेले नेते आणि आमदार आशिष दास यांनी मंगळवारी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा केली.

आशिष दास हे सुरमा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी मंगळवारी कोलकाता येथील प्रसिद्ध कालिघाट मंदिरात जाऊन यज्ञ केला. तसेच तिथे मुंडणही केले. हे मंदिर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळच आहे. पक्ष सोडताना दास यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरामध्ये राजकीय अराजकता पसरली आहे. राज्य सरकारच्या कामगिरीवर लोक प्रचंड नाराज आहे. त्यामुळंच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दास यांनी सांगितले. त्यांनी काही महिन्यांपूर्वी ममता बॅनर्जी यांना भावी पंतप्रधानही म्हटले होते. तसेच मागील दोन वर्षांपासून ते त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्याविरोधात सातत्याने वक्तव्य करत आहेत.

दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. ‘ना खाऊंगा, ना खाणे दुंगा’ हे मोदींचे वाक्य देशातील सर्व स्तरातील लोकांना भावले होते. पण आता देशात हा एक प्रसिध्द जुमला बनला आहे, असं दास म्हणाले. दास यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत ममतांचा विषय झाल्यानंतर त्यांचं कौतुक केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!