मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
तर काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, आरोन फिंच सारख्या खेळाडूंना संघांनी सोडलेले असल्याने आगामी आयपीएल लीलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची कोणत्याही संघात निवड होणे कठीण आहे.
आयपीएल स्पर्धा ही युवा खेळाडूंना प्रतिभा दाखवण्यासाठीचं व्यासपीठ म्हणून ओळखली जाते, पण एका 42 वर्षांच्या खेळाडूने आपण आयपीएल 2021 साठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. आयपीएल लिलावातला हा सगळ्यात वयस्कर खेळाडू असेल. भारताचे माजी स्पिनर दिलीप दोषी यांचा मुलगा नयन दोषी याने आयपीएल लिलावासाठी नावाची नोंदणी केली आहे. याआधी नयन दोषी 2010-2011 साली राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळला. डावखुरा स्पिनर असलेल्या नयन दोषीचं स्थानिक क्रिकेटमधलं रेकॉर्ड शानदार आहे.
स्पोर्ट्सकीडला दिलेल्या मुलाखतीमध्ये नयन दोषी म्हणाला, ‘मी तयार आहे. सध्या मी सर्वोत्तम बॉलिंग करत आहे. या खेळाबद्दल मला प्रेम आहे. पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करायचं आहे. पुन्हा एकदा मैदानात उतरायचं, हे मी जानेवारीच ठरवलं होतं.’ ‘माझ्या वडिलांनी मला काही आठवडे दिले. माझ्याकडे अनेक लोकांची मतं नाहीत, पण वडिल म्हणाले तू योग्य बॉलिंग करत आहेस,’ असं नयन दोषी म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- खाम नदीसाठी छावणीच्या सीईओंचा पुढाकार
- अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचा वाद : बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे?
- …म्हणून कर्णधार कोहलीने बुमराहला दुसऱ्या कसोटीत दिली नाही संधी
- एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मनपा आढावा बैठकीत आकृतीबंध मंजूरीची शक्यता
- टेस्लाकडून नवीन मॉडेल लाँच ! कार खरेदी साठी ‘या’ देशात सरकार देणार निम्मे अनुदान


