🕒 1 min read
चेन्नई : चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पहिला कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
तत्पुर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली असून भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
हा २७ वर्षीय खेळाडू मागील काही काळापासून सातत्याने क्रिकेट सामने खेळत आहे. अशात त्याला शारिरीक आणि मानसिकरित्या आराम मिळण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराच कोहली यांनी बुमराहला दुसऱ्या कसोटीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याजागी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिरजला संघात स्थान देण्यात आले आहे.
बुमराहप्रमाणे इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन यालाही दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. अर्थात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आपल्या प्रमुख वेगवान गोलंदाजांविना दुसरा कसोटी सामना खेळत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- टेस्लाकडून नवीन मॉडेल लाँच ! कार खरेदी साठी ‘या’ देशात सरकार देणार निम्मे अनुदान
- रोहित शर्माच्या परफेक्ट कव्हर ड्राइव्हने विराट प्रभावित, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
- सातारा-देवळाई विकासाला मिळणार हिरवा कंदिल; नगरविकास मंत्र्यांची आज बैठक
- महिलाच्या सन्मानाच्या गप्पा मारणारे पुरोगामी पुढारी पूजा चव्हाण प्रकरणात गप्प का ?
- कॉलेजला जाण्यासाठी निघालेल्या मालकाच्या अल्पवयीन मुलीला ट्रॅक्टरचालकाने पळवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
