Share

टेस्लाकडून नवीन मॉडेल लाँच ! कार खरेदी साठी ‘या’ देशात सरकार देणार निम्मे अनुदान

Published On: 

नवी दिल्ली: प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. आता सरकारनेही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला चालना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा अधिक विचार करत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने हवेचे प्रदूषण टळणार आहे. भारत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या गरजेसाठी ८० टक्के आयात करतो. त्यासाठी लागणाऱ्या विदेशी चलनाचे प्रमाण हे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने कमी होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर टेस्ला या प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनीने टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवरुन रविवारी कंपनीच्या भारतातील योजनांबाबत माहिती दिली होती. तर केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे वेळोवेळी महत्त्व सांगितले आहे.

त्यांनतर आता टेस्लाने शुक्रवारी दक्षिण कोरियामध्ये कार्स विक्रीला चालना देण्यासाठी आपल्या कॉम्पॅक्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) मॉडेल वाय लाँच केले. ही कार दक्षिण कोरियामध्ये लाँच करण्यात आली असून मॉडेल वाय येथे तीन पर्यायात उपलब्ध आहे. स्टँडर्ड रेंज मॉडल सेटची प्रारंभिक किंमत यूएस 54,191 अमेरिकी डॉलर (जवळपास 39 लाख रुपये) आहे. लाँग रेंज मॉडेलची सुरुवातीची किंमत आणि परफॉर्मन्स मॉडेलनुसार अनुक्रमे 69.99 मिलियन वोन (कोरियन चलन) आणि 79.99 मिलियन वोन आहे.

या वर्षापासून दक्षिण कोरिया 60 मिलियन वोनपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारसाठी सरकार शासकीय अनुदानाची संपूर्ण रक्कम देईल. याचा अर्थ असा की, जे ग्राहक केवळ मॉडेल वाय स्टँडर्ड मॉडेल खरेदी करतात, त्यांनाच संपूर्ण अनुदान मिळू शकते. मॉडेल वायचे लाँग रेंज आणि परफॉर्मन्स मॉडेल्स खरेदी करणाऱ्यांना निम्मे सरकारी अनुदान मिळेल. ऑगस्ट 2019 मध्ये मॉडेल 3 नंतर, मॉडेल वाय दक्षिण कोरियामधील टेस्लाचे नवीन उत्पादन आहे. 2018 मध्ये मॉडेल दहा नंतर टेस्ला दक्षिण कोरियामध्ये एसयूव्ही मॉडेल आणत आहे. जवळजवळ तीन वर्षांत हे प्रथमच घडत आहे. मॉडेल वायमध्ये पाच जागा आणि सात आसनांचे पर्याय उपलब्ध आहेत. सात जागांचा पर्याय नंतर देशात सादर केला जाईल.

यूएस ईव्ही ब्रँडने मॉडेल 3 सेडानचा प्रकारही बाजारात आणलाय. ज्याची किंमत 54.79 मिलियन वोनपासून सुरू होणार्‍या तीन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. नवीन मॉडेलच्या अनावरणानंतर टेस्ला कोरियाने सांगितले, देशातील 27 ठिकाणी सुपरचार्जेड स्टेशन स्थापित करेल आणि या वर्षाच्या अखेरीस देशभरात जास्तीत जास्त आठ देखभाल केंद्रे जोडतील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!