🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश मध्ये कॉंग्रेसकडून प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वा खाली जोरदार प्रचार सूर आहे. प्रियांका गांधी या स्वतः अमेठी , रायबरेली , वाराणसी या महत्वपूर्ण मतदार संघातून गाव निहाय प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रियांका गांधी यांना सामन्य जनते कडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तर आता लहान मुलांनीदेखील चौकीदार चोर है ! चा नारा दिला आहे. सोमवारी अमेठीमध्ये प्रचार करते वेळी प्रियांका गांधीसमोर काही मुलांनी नरेंद्र मोदींविरोधात चौकीदार चोर है! अशी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मोदींविरोधात काही अपशब्द देखील वापरले. यावर प्रियांका गांधी यांनी मुलांना चौकीदर चोर है! ही घोषणा ठिक आहे. पण, अपशब्द वापरू नका असे म्हणत चांगली मुलं बना असा मोलाचा सल्ला दिला.
सध्या देशात कॉंग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चौकीदर चोर है! असा नारा देत जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे आता देशातील प्रत्येक मुलाला देखील चौकीदार कोण आहे हे कळाले आहे. याचाच प्रत्यक्ष अनुभव प्रियांका गांधी यांना आला आहे. या संदर्भातला व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
This, in a nutshell, is how the Nehru-Gandhis ruled this nation for 70 years pic.twitter.com/ZdtFh76Cm9
— Abhijit Majumder (@abhijitmajumder) April 30, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

