Share

कोरोना रुग्णांचा एकटेपणा घालवण्यासाठी नर्सने लढवली शक्कल

Published On: 

🕒 1 min read

ब्राझील: गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून ते आजतागायत आपल्या आयुष्यावर असंख्य निर्बंध आले आहेत. आत्ताशा कुठे नवीन सुरुवात करणार तर पुन्हा एकदा कोरोनाने पूर्वरुप धारण केले. पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या अंधाराने आपले जीवन व्यापून टाकले. कुठलाही विरंगुळा नाही, आलेली मरगळ, उदासिनता, आर्थिक अडचणी यांमुळे आज अनेकांना मानसिक आजार जडत आहेत. त्यातच कोरोनाफोबिया नामक मानसिक आजाराचे प्रमाण वाढले आहे.

यामध्ये कोरोना रुग्णांना क्वारंटाईन राहावं लागत असल्यामुळे त्यांच्याच एकटेपणा आला आहे. या काळात या रुग्णांना मानसिक आधाराची मोठी गरज असते मात्र आयसोलेशनमुळे रुग्णांचे नातेवाईक देखील त्यांच्या जवळ जाऊ शकत नाहीत ब्राझीलमधील एका नर्सने अनोखी शक्कल लढवली आहे.

या नर्सनं कोरोना संक्रमित लोकांची मदत करण्यासाठी एक नवीन कल्पना शोधून काढली आहे. या नर्सनं आर्टिफिशियल ह्यूमन टच म्हणजेच, मानवी स्पर्श देणारा हात तयार केला आहे. ट्विटरवर गल्फ न्यूज कडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘देवाचा स्पर्श, नर्स आयसोलेटेड वार्डमध्ये लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. २ डिस्पोजेबल ग्लोव्हज गरम पाण्यानं भरून रुग्णांच्या हाताला बांधले आहेत. तसंच फ्रंटलाईन वर्कर्सना सलाम असंही म्हटलं आहे.’

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!