Share

औरंगाबादच्या खाम नदी पुनरुज्जीवन अभियानात आदित्य ठाकरेंना ‘विशेष रस’

Published On: 

औरंगाबाद : महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा’ या विशेष अभियानाअंतर्गत शहरातील अतिशय प्राचीन खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही महिन्यात नदीची साफसफाई, नदीकाठावर वृक्षारोपण, नदीकाठच्या भिंतींना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.७) या कामाचा आढावा घेतला. दर शनिवारी कामासंदर्भात होणार्‍या बैठकीची लिंक शेअर केल्यास मलाही त्यात सहभागी होण्यास आवडेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मनपाने खाम नदीसाठी १५ कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे, अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी या बैठकीत दिली. मागील काही महिन्यांपासून प्रत्येक शनिवारी लोकसहभागातून खाम नदीच्या पात्राची स्वच्छता इत्यादी कामे केली जात आहेत. शुक्रवारी खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासंदर्भात पर्यटनमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी आयुक्‍त पांडेय यांनी सांगितले की, हे काम पालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी अभियान, इको सत्व, व्हेरॉक, छावणी परिषद व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे.

नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पालिकेने १५ कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. दरवर्षी निधी उपलब्धतेनुसार टप्प्या-टप्प्याने नदीला गतवैभव प्राप्‍त करून देण्याचे काम पूर्ण केले जाईल. पाच वर्षात प्रकल्प नावारूपास येईल. ठाकरे यांच्यासह आमदार अंबादास दानवे यांनी या कामाचे कौतुक केले. यावेळी पर्यटमंत्री ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन हा उपक्रम राबवावा, अशी सूचना केली. तसेच प्रत्येक वेळी खाम नदीतील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले पाहिजे. दर शनिवारी कामासंदर्भात होणार्‍या बैठकीची लिंक शेअर केल्यास मलाही त्यात सहभागी होण्यास आवडेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!