Share

लॉकडाऊनमध्ये नियमांचे काटेकोर पालन करुन रुग्ण संख्या नियंत्रणात आणणार : जिल्हाधिकारी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता यावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने प्रशासनाला टप्याटप्याने पण काही कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सुरूवातीला रात्रीची संचारबंदी, त्यानंतर अंशत: लॉकडाऊन आणि आता संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनच्या काळात प्रशासन आणि लोकप्रतिनीधी समन्वयाने काम करणार आहे. लॉकडाऊनमध्ये नियमांचे काटेकोर पालन करुन रुग्णसंख्या नियंत्रणात आणणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा व शहरी भागातील कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस खासदार इम्तियाज जलील, जिल्हा परीषद अध्यक्षा मिना शेळके, आमदार सतीष चव्हाण, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, संजय सिरसाट, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, यांच्यासह अन्न औषध प्रशासन, आरोग्य, महसूल, नगरपालिका, पोलीस, कृषी, सहकार यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, यंत्रणांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित लोकप्रतिनधींना प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, रूग्ण दाखल करण्यासाठीच्या नियमावलीचे कटाक्षाने पालन करत लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या बाधीतांना सीसीसीमध्ये उपचार उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून अधिक त्रास आणि उपचारांची गरज असलेल्या रूग्णांसाठी खाटा उपलब्ध राहणार आहेत. जिल्हयातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन काळजीपुर्वक काम करत आहे. जिल्ह्यात आणि विशेषत: शहरात कोरोनाचा हॉट स्पॉट वाढत असल्याने नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णण घेण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणेला आपली क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बेडची संख्या वाढवण्यात प्रशासनाचा भर असणार आहे. जिल्ह्यात ताप, सारी रुग्णांचा सर्व्हे करणे सुरु आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जनजागृती तसेच प्रबोधन करणे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अंशत: लॉकडाऊनच्या काळात शहर,  ग्रामीण भागातही नियम मोडणाऱ्यांवर अनेक ठिकाणी कारवाई केली. तसेच मास्कचे वाटप देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात गरजुंना शिवभोजनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यासाठी केंद्राची संख्या वाढवणार आहेत. या कार्यात एनजीओंची देखील मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!