Share

शिवसेनेची भूमिका डबलढोलकीची; चंद्रकांत पाटलांची टीका

Published On: 

पुणे : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या त्यांच्या या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली. मात्र त्यांच्या या टीकेवरुन राज्याच्या राजकारणामध्ये मोठा वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. या वादाची ठिणगी अद्यापही विझलेली नाही.

पुण्यात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या काँग्रेसच्या नेत्यांशी भेटी वाढण्यावर पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला असता त्यांनी संजय राऊतांना खोचक टोलाही लगावला आहे.

यालाच तर डबल ढोलकी असे म्हणतात, ममता बॅनर्जी आल्या की, त्यांच्या सुरात सुर मिसळायचा आणि ममता बॅनर्जी यांची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सुर मिसळायचा यालाच डबल ढोलकी म्हणतात. सामान्य माणूस सुद्धा दुहेरी भूमिका घेत नाही, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!