नागपूर: आज ७ ऑगस्टरोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्तानेच आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ६ वे अधिवेशन ऑनलाइन आयोजित केले आहे. नागपूरमध्ये हे अधिवशन होणार आहे. यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावणार आहे. पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा केली जाणार आहे.
याच दिवशी दिवंगत पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांनी मंडल आयोग लागू केलेला होता. हा दिवस आठवणीत रहावा, याकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ६ वे अधिवेशन ऑनलाइन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान यावेळी इतर नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
या अधिवेशनात माजी आमदार नारायणराव मुंडे यांचा ओबीसी भूषण म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान आता ओबीसी आरक्षण संबंधी पुढील रणनीती आज ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी
- तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

