Share

उद्यापासून सर्व राज्यांमध्ये दुधाचे नवे दर लागू

Published On: 

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन, कडक निर्बंध असे उपाय योजिले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात चूल पेटणे देखील मुश्कील होऊन बसले आहे. अशात देशात मात्र इंधन दरवाढीने आकाश गाठले आहे. तर दुसरीकडे आता दुधाच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. १ जुलैपासून म्हणजेच उद्यापासून देशातील सर्व राज्यांमध्ये दुधाचे नवे दर लागू होणर आहेत.

अमूलच्या सर्व उत्पादनांच्या किमतीत २ रुपयांनी वाढ होणार आहे. यामुळे आता अमूल गोल्डची किंमत ५८ रुपये प्रति लीटर होणार आहे. तसेच अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम यांच्या किमती लिटरमागे २ रुपयांनी वाढणार आहे.

जवळपास दीड वर्षांनी अमूलकडून उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर सर्वच राज्यांमध्ये नवे दर लागू होतील.

मागील वर्षापासून कोरोनाच्या या संकटामुळे अनेकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत. एकीकडे असे चित्र असताना सततच्या होणाऱ्या त्यात आता महागाई वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांनी कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल आणि आता दुधाच्या किंमतीत देखील वाढ होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!