औरंगाबाद : खाम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात होता. त्यामुळे मिशन खाम तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत खाम नदी पुलाच्या परिसरात लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. सोमवारी (दि.७) झालेल्या मुसळधार पावसाने बारापुल्ला गेटवर बसविण्यात आलेल्या एका बाजूच्या जाळ्या कोसळल्या. सुदैवाने यावेळी रस्त्यावर जास्त वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांनी घटनास्थळी पाहणी करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या.
बारापुल्ला गेट परिसरातील नाल्यावर काही दिवसांपूर्वी औरंगाबाद मनपा आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे जाळी बसवण्यात आली होती. मात्र सोमवारी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे या जाळ्या कोसळल्या. रिपब्लिकन सेनेच्या सचिन निकम यांनी महापालिकेला हि माहिती कळवली. त्यानंतर भोंबे यांनी कर्मचार्यांसह धाव घेऊन दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली. संरक्षक जाळ्या बसविण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत.
त्यानुसार उद्यान अधीक्षक विजय पाटील, स्मार्ट सिटीचे कर्मचारी जाळ्या तयार करून बसवत आहे. या जाळ्या सिद्धार्थ गार्डन मधील कार्यशाळेत तयार केल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेचा ५० टक्के खर्च कमी होत आहे. काही दिवसांपासून या जाळ्याची रंगरंगोटी केली जात आहे. शहरातील २८ पुलांवर अशा जाळ्या लावल्या जाणार आहेत. मात्र सोमवारी एक जाळी कोसळल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींनी हे ऐकून घेतलं, ते ऐकून घेतलं असं सांगून राज्याचे प्रश्न केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न – निलेश राणे
- ‘मुळशी तालुक्याची रग दाखवा’ ; मुळशी दुर्घटनेनंतर प्रविण तरडे संतापले
- इमारत पाडण्याचे काम सुरू असताना तोल गेल्याने मजूर तरुणाचा मृत्यू
- प्रेयसीची छेडछाड केल्याच्या कारणातून डोक्यात दगड टाकला, जाधववाडी हत्या प्रकरणातील आरोपी अखेर अटकेत
- शिवूर, लासूर स्टेशन, वाळूज, आडूळ आणि विहामांडव्यात लवकरच आरोग्य केंद्र


