Share

शिवूर, लासूर स्टेशन, वाळूज, आडूळ आणि विहामांडव्यात लवकरच आरोग्य केंद्र

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत गुणवत्तापूर्ण भर घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार प्रस्तवित असलेली पाच नवीन आरोग्य केंद्रे सर्व सुविधांसह लकवर सुरू करण्यात येणार आहे. प्रशासकीय पातळीवर तशी तयारी सुरू आहे. या संदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला.

शिवना आणि गोंदेगाव येथील युनानी रुग्णालयांची दुरुस्ती करण्याचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत. तसेच लोकसंख्या आणि स्थानिक गरज लक्षात घेता अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. या संदर्भात उपलब्ध असलेल्या राज्य शासनासह स्थानिक आमदार निधीतून रुग्णवाहिका प्रस्तावित खरेदी लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही खेरदी तांत्रिक गुणवत्तापूर्ण व्हावी यावरही विचारमंथन करण्यात आले.

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी अद्यावत रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा-सुविधांसह ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णास सर्व उपचार मिळावेत. यासाठी प्रस्तावित ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी, दुरूस्ती यावर लक्ष देवून येणारी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाकडे लक्ष द्यावे असे निर्देश राज्यमंत्री सत्तार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!