पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या उरवडे याठिकाणी SVS Aqua Technologies कंपनीला लागलेल्या आगीत 15 महिलांसह एकूण 18 जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान या कंपनीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणली आहे. पिरंगुट एमआयडीसी मधील येथील एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला काल दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत अनेक मजूर अडकून पडले होते.
मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती या आगीत होरपळून जवळपास 15 महिलांसह 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या आगीनंतर घटनास्थळी अभिनेते प्रविण तरडे यांनी भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी घटनास्थळाचे दृश्य पाहून प्रविण तरडे हे सुद्धा संतापले. कंपनीत एका छोट्याशा जागेत 38 माणसांना काम करावे लागत असल्याचं पाहून प्रविण तरडे यांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्व नागरिक, सरपंच यांना कंपन्यांना भेट देऊन पाहणी करण्याचीही विनंती केली आहे.
प्रविण तरडे यांनी घटनास्थळावरून फेसबुक लाईव्ह केले होते. यात ते म्हणाले कि म्हणाले, ‘आपण एक काम करू आता जर आपली आई, बहिण, भाऊ, नवरा, बायको ज्या कंपनीत काम करत असतील तर त्यांना हात जोडून विनंती करा की आम्हाला तुमची कंपनी पाहू द्या. आता कंपनी लोकांनी आतमध्ये जाऊन पाहिली पाहिजे. प्रत्येक मुळशीतल्या सरपंच, उपसरपंचाला मी विनंती करतो जा कंपन्यांच्या आत आणि पाहा आपले भाऊबंध कसे काम करत आहेत. नाहीतर असेच जळून मरतील महिन्याभरानी, वर्षानी आणि आपण हा तमाशा पाहत बसायचा का?
https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/4265508230137086
इथं शेजारच्या कंपनीत मी नोकरीला होतो. प्राज इंडस्ट्रीजमध्ये 3 वर्षे मी कामाला होतो. या कंपन्यांचं फॅक्ट्री ले आऊट चांगलं आहे मग त्यांच्या शेजारी लागून असलेल्या कंपन्यांत ही व्यवस्था का नाही. 40 बाय 40च्या ठोकळ्यात 38 माणसं काम करतात का कधी? म्हणजे 20 माणसं वाचली यात आनंद मानायचा की दुर्दैव करायचं. 40 बाय 40च्या ठोकळ्यात 10-12 केमिकलच्या मशीन्स आहेत आणि 38 माणसं कामाला , तक्रार कोणाचीही नाहीये, जबाबदारी लोकांची आहे. प्रशासनावर, शासनावर अवलंबून राहू नका. आपले नातेवाईक तिथं काम करतात ना? आता आपली जबाबदारी आहे… आपण आतमध्ये जायचं कंपनीच्या आणि आपले आई-बाप कसे काम करतात ते पाहा. पोरांनो विनंती करतो आपण आपली तालुक्याची रग दाखवतो ना? दहा ठिकाणी आपली रग माहिती आहे जगाला. तर आता आपली रग आपल्या आई-बापांसाठी दाखवा. कंपन्यांच्या आत जाऊन पाहा.’ असे मत त्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आजच्या भेटीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?’
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

