औरंगाबाद : जाधववाडी भाजीमंडईत दगडाने ठेचून एकाची हत्या केल्याची घटना २१ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली होती. दादाराव सांडू सोनवणे (४५, रा. खेरवाडी, जाधववाडी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी ७ जून रोजी सिडको पोलिसांनी मिस्त्री काम करणाऱ्याला मिसारवाडीतून अटक केली आहे. सुनील जयसिंग निंभोरे (२३, रा. मिसारवाडी) असे आरोपीचे नाव असून प्रेयसीची छेड काढत असल्याने दादारावच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची त्याने कबुली दिली आहे. तर प्रेयसीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.
जाधववाडी भाजीमंडईतील मुख्य संकुला समोरील शॉपींग सेंटरच्या गच्चीवर लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला २१ मे रोजी दादाराव यांचा मृतदेह दिसून आला होता. त्यावेळी दादाराव यांची ओळख पटली नव्हती. दादाराव यांचा सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून खून केल्याची माहिती मिळताच सिडको पोलिसांसह गुन्हे शाखा, फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकाने धाव घेतली होती. त्यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ सिमेंटचा तुटलेला गट्टू, खिचडीचे पाकीट, रुमाल, मास्क, खिशात दोन नशेच्या गोळ्या, चिल्लर पैसे आणि बाजूला गाठोड्यात एक ड्रेस, रुमाल आढळून आला होता. दरम्यान, मध्यरात्रीनंतर दादाराव यांची ओळख पटली.
दादाराव यांचा मुलगा एमजीएम रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये कामाला असून, त्यांची मुलगी बारावीचे शिक्षण घेत आहे. तर दादाराव हे टेलरिंगचे काम करत होते. त्यांना मद्यपानाचे अती व्यसन होते अशी माहिती सोनवणे कुटुंबियांनी पोलिसांना दिली होती. दरम्यान, सिडको पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अखेर ७ जून रोजी मिसारवाडीतून मिस्त्री काम करणाऱ्या सुनील निंभोरेला हत्येच्या प्रकरणात अटक केली आहे.
तर त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सिडको पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिर्हे, सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, बाळासाहेब आहेर, सुभाष शेवाळे, नरसिंग पवार, प्रकाश डोंगरे, सुरज भिसे, सुशांत सोनवणे, गणेश नागरे, स्वप्नील रत्नपारखी यांच्या पथकाने केली.
अनैतिकसंबंधासाठी प्रेयसीसोबत छतावर
सुनील निंभोरे आणि त्याची प्रेयसी हे १४ मे पासून शारीरिक संबंध बनवण्यासाठी शहरभरात जागेच्या शोधात होते. पण जागा मिळत नालस्याने २० मे रोजी मध्यरात्री जाधववाडीतील भाजीमंडईतील त्या छतावर दोघेही गेले होते. त्यावेळी मयत दादाराव हा अगोदरच तिथे बसलेला होता. काही अंतरावर सुनील आणि त्याची प्रेयसी जाऊन बसले. काही वेळाने सुनील लघुशंकेसाठी गेला. तेव्हा दादारावने त्या प्रेयसीसोबत छेडछाड सुरू केली. हे सुनील याने पाहिले. त्यामुळे रागाच्या भरात बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू दादारावच्या डोक्यात सुनीलने घातला.
हत्या केल्यानंतर दोघेही दुसरीकडे…
दादाराव याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याची सुनील निंभोरेने हत्या केली. अनैतिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुनील प्रेयसीला घेऊन छतावर आला होता. मात्र, दादारावमुळे त्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर सुनील आणि त्याच्या प्रेयसीने बाजूच्या छतावर जाऊन संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघेही निघून गेले.
महत्वाच्या बातम्या
- एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

