मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ असलेल्या डोंबिवलीत तर प्रचंड संतापजनक घटना घडली आहे. एका 14 वर्षाच्या चिमुकलीवर 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याच राजकीय वजनाचा माज मनात ठेवून आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. महिला अत्याचारावरुन आता केंद्रीय मंंत्री रामदास आठवलेंनी राज्य सरकावर ताशेरे ओढले आहेत.
डोंबिवलीमध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी बलात्कार केल्याची महाराष्ट्राला हादरवणारी निषेधार्ह घटना उघडकीस आली आहे. महिला अत्याचार प्रकरणी राज्य सरकारचे दुर्लक्ष चिंताजनक आहे.यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करावी. असे गुन्हे पुन्हा घडू नयेत यासासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.
डोंबिवलीमध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी बलात्कार केल्याची महाराष्ट्राला हादरवणारी निषेधार्ह घटना उघडकीस आली आहे. महिला अत्याचार प्रकरणी राज्य सरकारचे दुर्लक्ष चिंताजनक आहे.यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करावी. असे गुन्हे पुन्हा घडू नयेत यासासाठी कठोर पावले उचलावीत.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 23, 2021
डोंबिवलीत 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- महिलांवर अत्याचाराची तिसरी लाट आलीय कोरोनाची नाही; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे
- ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले- छगन भुजबळ
- आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र..; हेमंत ढोमेची हळहळ
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- लातूरमध्ये क्रीडा केंद्र उभारा, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांची केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

